आजच्या बदलत्या बँकिंग व्यवस्थेमध्ये ग्राहकांना तंत्रज्ञानावर आधारित तत्पर व घरबसल्या बँकिंग सेवा अपेक्षित आहेत यासाठी माहीती व तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करुन विविध योजना सुरु करुन ग्राहकांना अद्यावत सेवा देणे व त्यांचे हित जपणे या कडे बँकेने प्राध्यान्य दिले आहे. नफा स्थिती उत्तम राखत बँकेने सभासदाचेही हित जपले आहे.
1. सेवेतील सभासद व सेवानिवृत सभासदांच्या पत्नीः यांना विविध आजारपणासाठी 1 लाखापर्यंत आजारपणाची मदत .
2. सेवेतील कर्जदार सभासदांना मृत्युनंतर मयत सभासद निधीतूनरु. 5 लाखापर्यंत कर्ज माफ.
3. सेवेतील सर्व सभासदांना मृत्युनंतर सभासद कल्याण निधीतून रु. 2.50 लाखापर्यंतची आर्थिक मदत (कर्जदार व बिगरसभासद कर्जदार)
4. सेवेतील सभासद मयत झालेस तातडीची मदत रु. 10 हजार (कर्जदार व बिगरसभासद कर्जदार)
5.सेवेतील सभासदाचा अपघाती म्रुत्यू झालेस रु. 1 लाख पर्यंतची जादा आर्थीक मदत (फक्त कर्जदार सभासद)
6. सेवेतील कर्जदार सभासदाचा मृत्यू झालेस रु. 7 लाख 60 हजार एकूण मदत
7. सेवेतील कर्जदार सभासदाचा अपघाती मृत्यू झालेस रु. 8 लाख 60 हजार एकूण मदत
8.सेवानिवृत सभासदांच्या मृत्युनंतर मयत सभासद निधीतून रु. 5 लाखापर्यंतचे कर्ज माफ.